माझा एकटेपणा.......!!!

परत कर, परत कर.

परत कर ते माझे क्षण,
जे तुझ्यासाठी मी घालवले होते.
परत कर ते माझे मन,
... ... जे तुझ्यासाठी कधी झुरले होते.

परत कर ते माझे हसू,
जे तुझ्यासाठी मी विसरलो होतो.
परत कर ती माझी आसवे,
जेंव्हा तुझ्यासाठी मी रडलो होतो.

परत कर ते माझं स्वप्न,
जे मी तुझ्यासाठी पाहीले होते.
परत कर ते माझं प्रेम,
जे तुझ्यावर मी केले होते

Comments

Popular posts from this blog

शोकांतिका

खरच काही मुले असतातच असे.