Posts

शोकांतिका

आई वडील म्हणाले मला घरात आणावी आता सून. त्यांच्याच कोर्टात चेंडू ढकलून म्हणालो तूम्हीच आणा नीट बघून.. सहाच महिन्यात त्यांनी मोहिम फत्ते केली, विनाअनुदानित का असेना माझी संसारवेल सुरु झाली. बघता बघता एक दीड वर्ष सरले, घरात एका चिमुकलीचे आगमन झाले.. हळूहळू दोघींमध्ये ठिणगी पडायला लागली, मलाही कळेना कुठे माशी शिंकली अन् युती का तुटली.. माझ्या बिनपगारी नोकरीचे परिणाम जाणवू लागले होते, घरातील ओलाव्याचे वारे आता कोरडे आणि तप्त बनत चालले होते. हळूहळू आटत चालले होते आपुलकी आणि ते प्रेमळ लक्ष, घरातच झाला एक सत्ताधारी तर दुसरा विरोधी पक्ष.. खूप प्रयत्न करुनही मने दुरावतच चालली होती, दोघींनीही मनोमन आपापली माणसे वाटून घेतली होती.. ज्याने त्याने आपला इगो जाणीवपूर्वक जपला होता, निस्वार्थी प्रेमळ नात्याचा सागर जणू काही आटला होता... कितीही प्रयत्न केला तरी मागे कोणी हटेना, माझ्यावरच्या हक्काचा 'काश्मिरचा तिढा' काही सुटेना.. काही सुचेना काय करावा इलाज कोणता टाकावा मंत्र, धगधगत्या घरात मी बनलो होतो अग्निशमन यंत्र.. एक म्हणे कसा आला म

माझे मित्र

हे साले मित्र सगळे असेच असतात  नको त्या वेळी छळुन सतावून जीव नकोस करतात ... प्रत्येकाची टेर  खेचायला एक्सपर्ट असतात ... पण बाहेरच्यांनी कळ काढली कि त्याला हिसका दाखवायला नेहमीच रेडी असतात... हे साले मित्र सगळे असेच असतात ... नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ... चहाचे बिल भरताना प्रत्येकाच्या नाकी नऊ येतात ... पण  कोणी  आजारी पडले तर नकळतपणे  हॉस्पिटलचे बिल भरले जाते..  दुःखात  पाठीशी खंबीरपणे उभे  राहतात ... हे साले मित्र सगळे असेच असतात ... नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ... एखाद्या वेळी खास पदार्थ आणला तर ... सर्वाना पुरेल याची बखर नसते ... पण जर कधी डबा आणला नसेल तर ... आपलेच ताट इतरांपेक्षा अधिक भरलेले असते ... हे साले मित्र सगळे असेच असतात ... नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ... प्रत्येकाची छोट्यातली छोटी गोष्ट प्रत्येकाला माहित असते ... आणि प्रत्येक वेळी सपोर्ट करायला हेच वेडे उभे असतात ... कधी चांगला तर कधी काळीज पिळवटून टाकणारा अनुभव देतात ... हे साले मित्र सगळे असेच असतात ... नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ... तरी सुद्धा प्रत्येक क्षणी

माझा हास्य कट्टा

रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात... आई म्हणते, "बाळा कोणतं स्टेशन आलं रे" मुलगा खिडकीतून बाहेर बघतो.... प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, "काका कोणतं स्टेशन आहे हे?" माणूस:- देवाने जे दोन डोळे दिलेत ना, त्याचा वापर करा.... गाडी फलाटावर येताना काय झोपा काढत होता का...? मोठी काळी-पीवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येताना...! तुम्ही हल्लीची पोरं.... कष्ट करायला नकोत... सगळं आयतं पाहीजे... . . . .  मुलगा:- आई.... पुणे आलं.

खरच काही मुले असतातच असे.

Image
खरच काही मुले असतातच असे. एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम ,करणारे ती आपली होऊ शकत नाही हे माहीत .असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे.. ,मुले असतातच असे. ,तिचे सर्व हट्ट पुरवणारे फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत .निस्वार्थी प्रयत्नात असणारे.. ,मुले असतातच असे. ,स्वतः खोडी काढणारे पण ती रागावली आहे हे पाहून .तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे.. ,खरच काही मुले असतातच असे. .माझ्या सारखे.. हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम .शोधणारे..

ती फक्त तुझीच राहील

Image
सर्व प्रेमपत्रे देऊन गेली सर्व आठवणी विसर म्हणाली परत नाही येणार कधीच, जाते म्हणाली सखी हृदय मात्र परत द्यायची विसरली. ती असं का वागली? ती असं का बोलली? तिच्या हृदयाने मग माझी असी समजूत काढली. "ती तुला नाही विसरली तुझ हृदय घेऊन ती गेली मला तुझ्याजवळ सोडून गेली पहिल्या प्रेमाची निशाणी ठेऊन गेली. ती पुन्हा परत येईल तुझा हृदय तिला घेऊन येईल प्रेमाचा वर्षाव पुन्हा होईल ती फक्त तुझीच राहील ती फक्त तुझीच राहील

ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..

ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी, तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी, तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी, तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी, तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी हा जन्म तुझ्यासाठीच घेतला असे म्हणनारी, तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी, तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी, तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी, ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली.. (¯`v´¯) .`•.¸.

खरे प्रेम......

खरे प्रेम........ आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत... ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...." आणि हेच खरे प्रेम.....:)