Posts

Showing posts from 2020

शोकांतिका

आई वडील म्हणाले मला घरात आणावी आता सून. त्यांच्याच कोर्टात चेंडू ढकलून म्हणालो तूम्हीच आणा नीट बघून.. सहाच महिन्यात त्यांनी मोहिम फत्ते केली, विनाअनुदानित का असेना माझी संसारवेल सुरु झाली. बघता बघता एक दीड वर्ष सरले, घरात एका चिमुकलीचे आगमन झाले.. हळूहळू दोघींमध्ये ठिणगी पडायला लागली, मलाही कळेना कुठे माशी शिंकली अन् युती का तुटली.. माझ्या बिनपगारी नोकरीचे परिणाम जाणवू लागले होते, घरातील ओलाव्याचे वारे आता कोरडे आणि तप्त बनत चालले होते. हळूहळू आटत चालले होते आपुलकी आणि ते प्रेमळ लक्ष, घरातच झाला एक सत्ताधारी तर दुसरा विरोधी पक्ष.. खूप प्रयत्न करुनही मने दुरावतच चालली होती, दोघींनीही मनोमन आपापली माणसे वाटून घेतली होती.. ज्याने त्याने आपला इगो जाणीवपूर्वक जपला होता, निस्वार्थी प्रेमळ नात्याचा सागर जणू काही आटला होता... कितीही प्रयत्न केला तरी मागे कोणी हटेना, माझ्यावरच्या हक्काचा 'काश्मिरचा तिढा' काही सुटेना.. काही सुचेना काय करावा इलाज कोणता टाकावा मंत्र, धगधगत्या घरात मी बनलो होतो अग्निशमन यंत्र.. एक म्हणे कसा आला म