Posts

Showing posts from October, 2011

माझा एकटेपणा.......!!!

Image
मी... वादळात उडणारा एक मातीचा कण मी... दुर्जनांच्या शरीरातील मन मी... दर्याच्या पोटातला एक तुषार मी... मुर्खांसमोर मन डोलावणारा हुशार मी... मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणारा परजीव मी... जन्माला आलेला एक निर्जीव मी... अन्यायाला हसत हसत पचवणारा षंड मी... ज्वालामुखीच्या उद्रेकातही थंड मी... माणुसकीच्या नावाला कलंक मी... लक्ष्मिसाठी स्वतःला विकणारा रंक मी... मानवाच्या अस्तित्वाची येणारी कीव मी... पण पोकळ विचारांनी भरीव मी... भ्रष्टाचार विरोधासाठी सदैव तयार मी... मात्र स्वार्थापोटी गानिमाचाही यार मी... नेत्यांच्या क्रूर चेष्टेचा साक्षीदार मी... पण या परिस्थितीला एक जबाबदार मी... मशाल घेऊन पावसाशी टक्कर घेऊ पाहणारा मी... पण पेटवण्या आधीच तीच मशाल विजवणारा मी... आक्रोशाने मावळ्यांना एकजूट करू पाहणारा मी... पण मावळाच असल्याने शिवरायांची वाट पाहणारा मी... स्वतःच स्वतःचा अभ्यास करून बघा तुम्हीही... नरकाच्या रांगेत माझ्या मागे उभे असाल तुम्हीही...

माझा एकटेपणा.......!!!

परत कर, परत कर. परत कर ते माझे क्षण, जे तुझ्यासाठी मी घालवले होते. परत कर ते माझे मन, ... ... जे तुझ्यासाठी कधी झुरले होते. परत कर ते माझे हसू, जे तुझ्यासाठी मी विसरलो होतो. परत कर ती माझी आसवे, जेंव्हा तुझ्यासाठी मी रडलो होतो. परत कर ते माझं स्वप्न, जे मी तुझ्यासाठी पाहीले होते. परत कर ते माझं प्रेम, जे तुझ्यावर मी केले होते
Image
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते, तर हे प्रेम नाही हा तर मोह…..! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही, तर हे प्रेम नाही ही तर वासना….! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल, तर हे प्रेम नाही ही तर तडजोड…! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात, तर हे प्रेम नाही ही तर मैत्री…! जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत… आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो…, तर ते आहे प्रेम….! जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता…., तर ते आहे प्रेम….! जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता…., तर ते आहे प्रेम….! जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल…., तर ते आहे प्रेम....!!!!!
कुणीतरी मला विचारले कि तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस मी हसत उत्तर दिले जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या तर तिला कधीच मिळवले असते......................