माझे मित्र

हे साले मित्र सगळे असेच असतात 
नको त्या वेळी छळुन सतावून जीव नकोस करतात ...
प्रत्येकाची टेर  खेचायला एक्सपर्ट असतात ...
पण बाहेरच्यांनी कळ काढली कि त्याला हिसका दाखवायला नेहमीच रेडी असतात...
हे साले मित्र सगळे असेच असतात ...
नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ...
चहाचे बिल भरताना प्रत्येकाच्या नाकी नऊ येतात ...
पण  कोणी  आजारी पडले तर नकळतपणे  हॉस्पिटलचे बिल भरले जाते.. 
दुःखात  पाठीशी खंबीरपणे उभे  राहतात ...
हे साले मित्र सगळे असेच असतात ...
नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ...
एखाद्या वेळी खास पदार्थ आणला तर ...
सर्वाना पुरेल याची बखर नसते ...
पण जर कधी डबा आणला नसेल तर ...
आपलेच ताट इतरांपेक्षा अधिक भरलेले असते ...
हे साले मित्र सगळे असेच असतात ...
नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ...
प्रत्येकाची छोट्यातली छोटी गोष्ट प्रत्येकाला माहित असते ...
आणि प्रत्येक वेळी सपोर्ट करायला हेच वेडे उभे असतात ...
कधी चांगला तर कधी काळीज पिळवटून टाकणारा अनुभव देतात ...
हे साले मित्र सगळे असेच असतात ...
नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात ...
तरी सुद्धा प्रत्येक क्षणी ते हवे हवेसे वाटतात ...
त्यांच्याशिवाय जगणे रटाळ होते ...
बोरिंग झालेल्या आयुष्याला चव आणण्याच काम ...
हे मित्र करतात ...
आणि हे साले सगळे असेच असतात ... 
 नको त्या वेळी छळुन  सतावून जीव नकोस करतात....

Comments

Popular posts from this blog

शोकांतिका

माझा एकटेपणा.......!!!

खरच काही मुले असतातच असे.