रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात... आई म्हणते, "बाळा कोणतं स्टेशन आलं रे" मुलगा खिडकीतून बाहेर बघतो.... प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, "काका कोणतं स्टेशन आहे हे?" माणूस:- देवाने जे दोन डोळे दिलेत ना, त्याचा वापर करा.... गाडी फलाटावर येताना काय झोपा काढत होता का...? मोठी काळी-पीवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येताना...! तुम्ही हल्लीची पोरं.... कष्ट करायला नकोत... सगळं आयतं पाहीजे... . . . . मुलगा:- आई.... पुणे आलं.
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते..... पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......." ती कायमची निघ...
खरे प्रेम........ आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत... ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...." आणि हेच खरे प्रेम.....:)
Comments
Post a Comment