Posts

Showing posts from September, 2011

!!!...एक प्रेम कथा....!!!

Image
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते..... पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......." ती कायमची निघ
मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्याबाबतीत. तशीही प्रत्येकाच ीच इच्छा असते एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं. प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्केलोकांच्या बाबतीत खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात. आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक
प्रेमात तर दोघेही आहोत, पण इशारा कोण देणार..? बोलायचे तर दोघंानाही आहे, पण शब्द कोण देणार..? ... ... ... भेटायचे तर दोघंानाही आहे, पण वेळ कोण देणार..? प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही, पण पहल कोण घेणार..? स्पर्श तर दोघंानाही हवा आहे, पण हींमत कोण देणार..? तोडायचेत पाश बंधनाचे, पण साथ कोण देणार..? सोबत तर हवी आहे जन्माची, पण हात कोण देणार..? प्रेमात तर दोघेही आहोत, पण इशारा कोण देणार..?
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे, त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे, आणि स्वप्नाच्य ा दुनियेत बांधलेले घर, खाडकन फुटावे..

"सारे कळत नकळतच घडते"

मनाच्या कोपर्यात कविता कधी अशीच सुचत नाही कुठे तरी मनात न बोलता सांगणार असत खुप काही..... मनात घुटुन बसतात व्यक्त होणारे असंख्य शब्द मन हतबल होउन निपुट पणे पाहत सगळ स्तब्ध..... फेडन्याची इच्छा असुनही न फेडताच ठेवावी लागतात देणी अनेक दुख गिळत आपण डोळ्यातलेही थेंब गिलतो मनोमनी..... जगण्याच नाटक कराव लागत क्षणोक्षणी मरताना जिंकत आलेल स्वप्न पाहाव लागत कधी हरताना..... उन्हाचे चटके झेलून अनेकांसाठी झाडाची सावली व्हाव लागत सार असह्य होउन सुद्धा डोळ्यातील थेंम्बाना निमूट प्याव लागत..... अनेक विचार मांडल्यावर मग कागदावर येतात शब्द धाऊन विचारांच्या जंगलातला वणवा न पेटताच विजतो राहून..... हे सार सोसल्यावर मग कुठे जन्मते कविता टीच भर टीच भर असली तरी अनेकांचे गहिवरून आणते मन खर.....

‎"sare kalat nakalatach ghadte" "सारे कळत नकळतच घडते"

अनओळ्ख्या हाकेला मी साद घालुन चुकलो, कधीही न भरकट्नारा मीहि एकदा भरकटलो एका आठ्वड्याच्या ओळखित मी तिला आवडलो समजुन फसलो, कधीही न भरकट्नारा मीहि एकदा भरकटलो फक्त दोन वेळ्चं फोनवरचं बोलणं याला प्रेम समजुन बसलो, कधीही न भरकट्नारा मीहि एकदा भरकटलो ती करत होती टाईमपास तिला मी माझी खास समजुन चुकलो, कधीही न भरकट्नारा मीहि एकदा भरकटलो का वागतात या मुली अशा हा विचार करुन करुन थकलो, कधीही न भरकट्नारा मीहि एकदा भरकटलो एका आठवड्याच्या प्रवासानंतर पुन्हा मी एकटाच होतो, रुसलेल्या माझ्या मनाला कसेतरी समजावत होतो.